प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्याप बऱयाच विद्यार्थ्यांनी बसपास घेतले नाहीत. त्यांच्यासाठी बसपास प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दररोज 10 ते 15 विद्यार्थी बसपास विभागात अर्ज दाखल करताना दिसत आहेत.
दरवषी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रक्रिया सुरू व्हायची. मात्र कोरोनामुळे गतवर्षापासून बसपास प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. शिवाय गतवर्षापासून बसपास प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे बसपास मिळविणे किचकट बनले आहे. यंदा 58 हजार विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. मात्र उशिराने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप बसपास मिळाले नाहीत. असे विद्यार्थी बसपाससाठी आता अर्ज दाखल करत आहेत. याबरोबरच बसपासमधील दुरुस्ती, ये-जा करणाऱया मार्गात बदल व इतर दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. तसेच दिव्यांगांना बसपास वितरित केले जात आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना बसपास मिळाले नाहीत, असे विद्यार्थी वैयक्तिक येऊन अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत बसपास दिला जात आहे. गतवर्षापासून सुरू केलेली ऑनलाईन पद्धत विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. शिवाय बसपास हातात मिळायला कालावधीदेखील अधिक लागत असल्याने बसपासकडे काही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे.
बीएड विद्यार्थ्यांसाठी मार्चपासून प्रक्रिया सुरू
ज्या विद्यार्थ्यांना बसपास मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना बसपास दिला जात आहे. मात्र विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा, महाविद्यालयांतून प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी मार्चपासून बसपास प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (बसपास विभाग, डेपो मॅनेजर)