प्रतिनिधी/ बेंगळूर
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी सांलनालयाने (ईडी) शुक्रवारी पुन्हा नोटीस बजावली आहे. 7 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात भारत जोडो यात्रा सुरू असताना ईडीने डी. के. शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा नोटीस पाठविण्यात आली आहे. काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 6 नोव्हेंबर रोजी बेंगळूरला येत आहेत. त्यामुळे त्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी राज्य काँग्रेसकडून तयारी सुरू असतानाच शिवकुमार यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.