वार्ताहर / कणकवली:
शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी येथील सुनील पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे मार्गदर्शक तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जाहीर केली. निवडीबद्दल सुनील पारकर यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल जाधवराव, कोषाध्यक्ष विकास चव्हाण, प्रचार प्रसार महाराष्ट्र प्रमुख सचिन कळझूनकर आदींनी अभिनंदन केले. याप्रसंगी भास्कर राणे, अॅड. प्रवीण पारकर, श्री. निंबाळकर आदी उपस्थित होते.