बेळगाव / प्रतिनिधी
अयोध्यानगर, गणेशपूर येथील शिवशक्ती मानव कल्याण सेवा संस्थेच्यावतीने श्री क्षेत्र महाकाळेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात झाली. गुरुवारी पहाटे मंदिरात रुदाभिषेक, नवनाथ पूजन करण्यात आले. यावेळी नैउपाध्यक्षा रोशनी मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. शुक्रवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी बहुसंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्ताने मूर्तीवर आकर्षक आरास करण्यात आली होती. याप्रसंगी शंकर पाटील, मदत मोहन मोहिताज, उमेश चोपडे, सोनाजी आदी भक्तगण उपस्थित होते.