शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांचा निर्धार
प्रतिनिधी/ सातारा
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्यासह सर्व वरीष्ठांच्या सुचनेनुसार सातारा नगरपालिकेची निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शहरप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख शिवसेना नेते दिवाकर रावते व शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडूदादा सपकाळ, शिवसेनेचे उपनेते सातारा सांगलीचे संपर्कप्रमूख नितीन बानुगडे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱया सातारा पालिकेच्या निवडणूकीत शिवसेना पुर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे.