15 हजार रकमेची पारितोषिके
प्रतिनिधी / मालवण:
नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय विनामूल्य ऑनलाईन कोळी नृत्य स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे खोबरेकर यांनी स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली. वैयक्तिक प्रकारात होणारी ही स्पर्धा दोन गटांत घेतली जाणार आहे. 15 वर्षांखालील व 15 वर्षांवरील असे गट असणार आहेत. पहिला गट : प्रथम पारितोषिक 2 हजार, द्वितीय 1500, तृतीय 1 हजार. दुसरा गट : प्रथम 3 हजार, द्वितीय 2 हजार, तृतीय 1500 रुपये तसेच विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहेत. यासह ज्या व्हीडिओला जास्त लाईक मिळतील. त्या प्रत्येक गटातील एका व्हीडिओला विशेष रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.
स्पर्धकांनी वेशभूषेसह आपले व्हीडिओ 10 ऑगस्टपर्यंत (9607677408) या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवावेत. आपला पासपोर्ट फोटो व नाव पत्ताही पाठवावा. पहिल्या 50 स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मान्यवर परीक्षकांद्वारे स्पर्धेचे परीक्षण होणार असून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण केले जाणार आहे. आजपासूनच वेशभूषेसह आपले व्हीडिओ पाठवून स्पर्धेतील आपले स्थान निश्चित करावे.