सेन्सेक्सची60 अंकांनी वाढ : बँक, वाहन, पायाभूत क्षेत्रात घसरण
वृत्तसंस्था /मुंबई
मागील आठवडय़ाच्या अंतिम दिवशी शुक्रवारी शेअर बाजार मोठय़ा घसरणीसह बंद झाला होता. परंतु यामधून काही प्रमाणात सावरत शेअर बाजार पुन्हा तेजीची नोंद करत बाजार सप्ताहाच्या पहिल्या आठवडय़ात सोमवारी बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 60 अंकांनी वधारुन 38,417.23 वर बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21.20 टक्क्मयांनी वधारुन निर्देशांक 11,355.05 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीवर बँकिंग, वाहन आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्र घसरणीसह बंद झाले आहेत. शेअर बाजार सकाळपासून घसरणीसोबत सुरु झाला होता. परंतु दुपारनंतर मात्र खरेदी वाढल्याने अंतिम क्षणी शेअर बाजार तेजी नोंदवत बंद झाला आहे.
बँकिंग क्षेत्रामध्ये बंधन बँक आणि फेडरल बँक यांचे समभाग सर्वाधिक घसरणीसह बंद झाले आहेत. तसेच ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा यांचे समभाग एक- एक टक्क्मयांनी वाढले आहेत. वाहन क्षेत्रात दुपारनंतर विक्री वाढल्याने यातील महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग चार टक्क्मयांनी नुकसानीत राहिले आहेत.
मुख्य कंपन्यांमध्ये भारती इंफ्राटेल 5.27, एचडीएफसी लाईफ 3.24,डॉ. रेड्डीज लॅब 2.33, आयटीसी 1.87, हिंदुस्थान युनि 1.66 टक्क्मयांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 3.59, युपीएल 2.82, बजाज फायनान्स 2.47, गेल 2.35 आणि एनटीपीसीचे समभाग 2.16 टक्क्मयांनी घसरुन बंद झाले आहेत. जगातील शेअर बाजारांमध्ये शांघाय कंपोजिट 0.16 टक्क्मयांनी घसरत बंद झाला तर युके, जर्मनी आणि फ्रान्सचे शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाले आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आता गुंतवणूकदारांमध्ये दबाव निर्माण करत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱया स्थानी पोहचला आहे. येत्या काळातही गुंतवणूकदारांमध्ये भीतीची छाया राहणार आहे.