छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावतीने कुंभोज येथे शिवार भेट
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले येथे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शिवार भेट घेऊन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. परिणामी सेंद्रिय शेतीचा वापर करून ठिबक सिंचनाचा वापर करावा परिणामी शेतीमध्ये दुय्यम पिकांचाही अवलंब करावा असे मत कारखाना संचालक व माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले.
यावर्षी कारखान्याच्या वतीने सभासदांना संकरित रोपे खते, कीटकनाशके, ठिबक सिंचन देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या लाभ घ्यावा माजी आमदार अमल महाडिक यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी कुंभोज येथील प्रगतशील शेतकरी तुषार शिंगे राहुल शिंगे, बबन आरगे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष ऊस क्षेत्र, लागवडीखालील क्षेत्र, खोडवा क्षेत्राची माहिती घेण्यात आली. परिणामी सदर शेतीसाठी आवश्यक असणारे माती परीक्षण, ठिबक सिंचन योजना व सभासदांना आवश्यक असणारे रोपवाटिका, खतपुरवठा, कीटकनाशकांचा पुरवठा ठिबंक सिचंन सबसिडी वरील पुरवठा आदी विषयांची माहिती कारखाना व्यवस्थापन यांच्यावतीने शेतकरी सभासदांना देण्यात आली.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्जेराव माने, माजी आमदार अमल महाडिक, दिलीप पाटील, बिरदेव तानगे, शेती अधिकारी आवटे साहेब, विनायक पाटील यांचा सत्कार शिंगे परिवाराच्या वतीने करण्यात आला.
शेतीमध्ये युवकांची संख्या वाढत असून युवकांनी आधुनिक शेतीकडे आपले लक्ष केंद्रित करावे आधुनिक शेतीसाठी लागणारा सर्व पुरवठा कारखाना व्यवस्थापन करेल परिणामी उत्पादनाबरोबरच शेतीच्या दर्जाकडे ही लक्ष देण्यात यावे असे मत कारखान्याचे सर्कल अधिकारी विनायक पाटील यांनी मानले. कारखाना ऊस वाहतूक यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्या शेतकऱ्यांनी कारखाना संचालका समोर मांडल्या त्याचे लवकरात लवकर निरसन केले जाईल असे आव्हान अमल महाडिक यांनी दिले. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्यासाठी परिसंवादाचे आयोजन कारखान्याच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही मत त्यांनी मांडले.
यावेळी अमल महाडिक यांनी कुंभोज येथील आधुनिक गोठा पालन शेतकरी सुनील भोकरे, बबन आरगे, यांच्या गोठ्याला भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार बलुपंत कुलकर्णी, अशोक चौगुले तुषार शिंगे, राहुल शिंगे, विनोद शिंगे, अमीत साजनकर, रवी जाधव, विश्वजीत माने, सुभाष देवमोरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कारखान्याचे सभासद व शेतकरी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक विनायक पाटील व आभार पत्रकार विनोद शिंगे यांनी मानले.