काळे मास्क घालून केला निषेध व्यक्त
प्रतिनिधी /पणजी
उत्तर प्रदेश येथील शेतकऱयांच्या खुनाच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने येथील आझाद मैदानावर मुकमोर्चा काढला. तोंडाला काळया रंगाचे कापडी मास्क बाधून निषेध व्यक्त केला. देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या मुक मोर्चाचा एक भाग म्हणून गोवा प्रदेश काँग्रेस समितीने येथील आझाद मैदानावर मुक मोर्चाचे आयोन केले होते.
माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम, यांच्यासह अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते मुकमोर्चात सहभागी झाले होते. निष्पाप शेतकऱयांच्या खूनात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाचा हात असून अजय मिश्रा तेनी यांनी त्वरीत राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्रा यांना काढून टाकावे असी मागणी काँग्रेसने केली आहे.
येथील आझाद मैदानावर सोमवारी सकाळी 11.30 पासून आयोजित केलेल्या मुकमोर्चा कार्यक्रमात पी. चिदंबरम पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत या खून प्रकरणात दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीष चोढणकर, विरोधीपक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, कार्यकारी अध्यक्ष ऍलेक्स सिक्वेरा, आमदार ऍलेक्सीयो रेजीनाल्ड, ऍड. रमाकांत खलप, उदय मडकईकर, रुदाल्फ फर्नांडिस, जनार्दन भंडारी, बिना नाईक विजय भिके, मोहन धोंड यांच्यासह सुमारे 200 कार्यकर्ते उपस्थित होते. खूनाची घटना घडल्यानतंरही मंत्र्याच्या मुलावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा त्याला अठक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. भाजप सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला होता त्यात चार शेतकऱयांचा समावेश आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तीघांना अटक करण्यात आली असून त्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री तेनी यांच्या मुलाचा समावेश आहे.