साहित्य : दीड वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी शेवग्याचा पाला, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा तेल, चवीपुरते मीठ, तेल आवश्यकतेनुसार
कृती : शेवग्याचा पाला स्वच्छ करावा. कोरडा करून नंतर बारीक चिरावा. बाऊलमध्ये गव्हाचे पीठ चाळून घ्यावे. त्यात हळद पावडर, लाल तिखट पावडर, जिरेपूड, गरम मसाला पावडर, आमचूर पावडर आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात चमचाभर तेल घालून मिश्रण पुन्हा एकदा हातानेच मिक्स करावे. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळा मळून पंधरा मिनिटे झाकूण ठेवावा. आता तेलाच्या हाताने पुन्हा एकदा गोळा मळून त्याचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. पोळपाटावर कोरडे पीठ पसरवून त्यावर गोलाकार पराठा लाटावा. तयार पराठा गरम तव्यावर टाकून कडेने तेलाचे थेंब सोडून सोनेरी रंगावर भाजावा. आता तयार पराठा बुंदी रायत्यासोबत खाण्यास द्या.