प्रतिनिधी/ बेळगाव
शाहूनगर येथील कदम ट्रान्सपोर्टचे संचालक श्रीकांत आनंदराव कदम यांनी पंतप्रधान रिलीफ फंडाला 1 लाख रूपयांची मदत केली आहे. कोरोना ग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून कदम यांनी ही मदत केली आहे.
केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे त्यांना 1 लाखांचा हा धनादेश सुपूर्द केला. इतर नागरिकांनीही देश अडचणीत असल्याने मदत करण्याचे आवाहन केले. मंत्री अंगडी यांनी कदम यांचे कौतुक करून असेच सामाजिक कार्य करत रहा, असे कदम यांना सांगितले.