हिंडलगा श्रीराम कॉलनी येथे मंदिर उभारण्याचा संकल्प
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा श्रीराम कॉलनीमध्ये श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी श्रीराममंदिरच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनासाठी कॉलनीतील रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर, ग्रा. पं. सदस्य व माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, ग्रा. पं. सदस्या व माजी अध्यक्षा रेणू गावडे, सदस्या चेतना आगसगेकर, सदस्य नितीनसिंग रजपूत, ग्रा. पं. सदस्या सीमा देवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती मिलके यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील, शिवाजी नलवडे, विलास नलवडे, इराप्पा बेळगावकर, यशवंत कांडर, उमाजी नेसरकर, दीनानाथ शिरसाठ, रमेश मेलगे यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. तसेच पांडुरंग गावडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मारुती मिलके यांनी केले. भुजंग गावडे यांनी आभार मानले. परशराम पाटील, वांदे सर, गोखले, रणजित चांदीलकर, बाळाराम चांदीलकर, कल्लाप्पा पाटील यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अनेक रामभक्तांनी मंदिरासाठी देणगी देऊन सहकार्य केले. यावेळी महिलावर्ग व कॉलनीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.