प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर ता. बैलूर ग्राम पंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्र. 5 मधून परत दुसऱयावेळी लक्ष्मण यल्लाप्पा बन्नार यांना निवडून दिल्याबद्दल शहापूर येथील श्रीराम मंदिरामध्ये हभप श्री लव महाराज नार्वेकर लोकप्रिय मृदुंगवादक यशवंत बोदे यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासबाग येथील क्रांती महिला मंडळाच्या सचिव शारदा भेकणे, शहापूर पारायण मंडळ, पी. बी. रोड खासबाग येथील वारकरी व भाविक भक्त हभप कुश महाराज नार्वेकर, ज्ञानेश्वर काकडे, मोहन वादवणे, बाळू पाटील अनगोळ, फोंडू सुतार, मारूती होमकर, चंद्रकांत बेळगावकर, बाळकृष्ण नार्वेकर राजाराम नार्वेकर, परशराम मिरजकर, राजाराम सुतार, वैजनाथ अचुकर हजर होते.