प्रतिनिधी/ बेळगाव
श्री स्वयंभू गणेश मंदिर अनगोळ नाकातर्फे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दि. 15 रोजी सकाळी 6 पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
सकाळी 6 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते 9 पर्यंत अभिषेक, सकाळी 11 वाजता महागणहोम, दुपारी 12 वाजता गणेश जन्मोत्सव, दुपारी 4 ते 6 पर्यंत महिला भजनी मंडळ, हंगरगे यांचा कार्यक्रम तसेच सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सांप्रदायिक भजनी मंडळाचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल. रात्री 9 वाजता मंत्रपुष्पांजली व महाआरती होईल.
मंगळवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत खीर प्रसादाचे वितरण करण्यात येईल. रात्री 9 वाजता महाआरती आहे. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे अध्यक्ष दामोदर भोसले यांनी कळविले आहे..