प्रतिनिधी/ मायणी
येथील हृदय रोग तज्ञ डॉक्टर शशिकांत कुंभार यांच्या श्रेयस हॉस्पिटल ला नव्याने कोरोना सेंटरची मान्यता मान्यता मिळाल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी डॉक्टर शशिकांत कुंभार व त्यांचे बंधू सूर्यकांत कुंभार यांनी 1992 सङङङ श्रेयस हॉस्पिटल सुरू केले तत्पर सेवा अचूक निदान आणि रुग्णात परमेश्वर शोधणे या त्रिसूत्री मुळे हे हॉस्पिटल लवकरच ग्रामीण भागात नावास आले याच सोबत त्यांचे छोटे बंधू सूर्यकांत कुंभार यांच्या होमिओपॅथी व युनानी सेवेमुळे सामान्य जनतेत आशा निर्माण झाली सध्या मायनी परिसरात म्दन्ग्d-19 हे विषाणू संसर्ग करू लागले आहेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशावेळी म्दन्ग्d-19 हे विषाणू वाढू न देणे व संक्रमित झालेल्या रुग्णावर विनाविलंब उपचार करून त्यांना जीवनदान देण्यासाठी या उतारवयात डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी कंबर कसली आहे यमाच्या मगरमिठीतून रुग्णाला परत आणण्याची धमक त्यांच्यात असल्याने सामान्य रुग्णांच्या आशा वाढले आहे सेंटरला मान्यता मिळाल्यानंतर आमच्या आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले वयपरत्वे मी कोरुना बाधित रुग्णांना सेवा देण्याबद्दल शाशंक होतो परंतु माझे सवंगडी यामहा मारीत गेल्याने मी कोरुना रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला