सोशल मीडियावर दरदिनी कुठला ना कुठला व्हिडिओ व्हायरल होत असतो. आता एका श्वानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून ज्यात तो पेंट ब्रश पकडून कॅनव्हासवर चित्र साकारताना दिसून येतो.
या व्हिडिओला मेरी अँड सीक्रेट नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन शेफर्ड श्वानाला एका पेंटब्रशचा वापर करत कॅनव्हासवर पेंटिंग करताना पाहू शकतात. या श्वानाचे नाव सीक्रेट आहे.
चित्र रंगवताना सीक्रेटने कुठल्याही मदतीशिवाय एक पिवळे फुल तयार केल्याने हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकप्रिय ठरला आहे. सीक्रेटने सूर्यफुलाचे चित्र रेखाटले होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मेरी यांच्याकडून कॅप्शन जोडण्यात आली आहे. विविध आकृतींना ब्रशने चित्रित करताना मोठी मजा आली. कुठल्याह लक्ष्याशिवाय सीक्रेटने स्वतःच्या बळावर ओळखता येतील अशी आकृती तयार केली. हे त्याचे पहिले चित्र असल्याचे मेरी यांनी नमूद केले आहे. सीक्रेटचे चित्र काढण्याचे कौशल्य पाहून सोशल मीडिया वापरकर्ते दंग झाले आहेत.