ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन श्वानाबरोबर खेळताना पाय घसरून पडले. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. बायडन यांचे खासगी डॉक्टर केविन ओ कॉर्नर यांनी यासंदर्भात तेथील स्थानिक माध्यमांना माहिती दिली.
बायडेन यांच्याकडे दोन श्वान आहेत. त्यामधील मेजर नावाच्या जर्मन शेफर्ड श्वानाबरोबर ते खेळत होते. खेळताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना चालण्यास त्रास होऊ शकतो.
दरम्यान, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत बायडेन लवकर बरे व्हावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.