प्रतिनिधी/ पणजी
गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करण्यासाठी माहिती आणि प्रसिद्धी खात्याने बोधचिन्ह स्पर्धा (लोगो) आयोजित केली असून निवड केलेल्या बोधचिन्हाचा वर्षभर साजरा होणाऱया षष्टय़ब्दी सोहळ्य़ात वापर केला जाणार आहे.
सरकारच्या वर्षभरातील सर्व पत्रव्यवहारातही ते बोधचिन्ह उपयोगात आणले जाणार आहे. गोव्याची अस्मिता दाखवणारे ते बोधचिन्ह असावे आणि ते गोमंतकीयांनी तयार करुन आपल्या संपूर्ण माहितीसह पाठवावे. मूळ गोमंतकीय असणाऱया सर्वांसाठी स्पर्धा खुली असून 14 डिसेंबर सायंकाळी 5.30 पर्यंत ते पाठवण्याची अंतिम मुदत आहे. रु. 10 हजार हे बक्षीस असून gदत्दुद60Ÿgस्aग्त्.म्दस् येथे ते पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.