प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील संगमेश्वर ते जाकादेवी रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा देऊन किमान दोन पदरी रस्ता केला जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यातील चर्चेनंतर प्रस्तावित कामे वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.
संगमेश्वर ते गणपतीपुळे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱया पर्यटकांना गणपतीपुळेला जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. पर्यटक सध्या महामार्गावरून निवळी मार्गे गणपतीपुळ्याला जातात. प्रस्तावित रस्त्यावरून पोचरी-फुणगूस डिंगणी जाकादेवीमार्गे गणपतीपुळे हे अंतर 40 किलोमीटरने कमी आहे.
श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडा 2017-18 या योजनेतंर्गत या कामासाठी 6 कोटी 9 लाख रुपये मंजूर आहेत. सध्या हा रस्ता 3.75 मीटर रुंद असून तो 15 मीटर रुंद केला जाणार आहे. संगमेश्वर ते जाकादेवीदरम्यान 4 रस्त्यांचा समावेश आहे. त्यामध्ये आरवली माखजन डिंगणी-संगमेश्वर ( प्रमुख जिल्हा मार्ग, दहा किलोमीटर), पोचरी फुणगूस डिंगणी (इतर जिल्हा मार्ग), विल्ये-पोचरी-उक्षी-वांद्री (प्रमुख जिल्हा मार्ग), अंजनवेल-रानवाö पालपेणे- राईö भातगाव-साखळी ते तरवळ अशा चार मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग रुंद केल्यास पर्यटन विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.