संगमेश्वर / प्रतिनिधी
सकाळ पासून ढगाळ वातावरणासह गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यासह तालुकावाशीयांची धावपळ उडाली. तसेच अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा पिकावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.