ऑनलाइन टीम / मुंबई :
‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून सुरू आलेला वाद आता थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. साताऱ्याचे भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यात संदर्भात दिली राम कदम यांनी ही तक्रार दिली आहे.
आमदार राम कदम सकाळपासून घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही राम कदमांनी दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या व्यक्तव्या विरोधात त्यांनी माफी मागावी. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर संजय राऊत यांनी अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे सांगितले. त्यावर गृह खात काहीच करत नाही. संजय राऊत यांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.