प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी शहरानजीकच्या कबनूर येथील राजकीय वादातून झालेल्या संदीप मागाडे या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे याला शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली. संशयित कांबळे हातकणंगले येथे येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला हातकणंगले येथून ताब्यात घेतले.