प्रतिनिधी / कोल्हापूर
संभाजीनगर परिसरातील शोले नगर झोपडपट्टी या ठिकाणी एका शेडमध्ये पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकून जुना राजवाडा पोलिसांनी १० जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पत्त्याची पाने व दोन हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत पोलीस दलाकडून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच अवैधरित्या वर्तन करणाऱ्यांवरही पोलीस दलाकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी संभाजीनगर परिसरातील शोले नगर येथील झोपडपट्टीमध्ये मोहन सिद्धगणेश यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पथक पाठविले. या पथकातील पोलीसांनी त्या ठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख २ हजार रुपये व पत्ते जप्त करण्यात आले.
यात मोहन सिद्धगणेश, राकेश चौगुले, राजू कुराडे, मारुती गाडीवडर, गुणवंत कांबळे, प्रकाश दांवणे, विनोद कांबळे, रियाज शेख, भागवत सिद्धगणेश, बंडू सिद्धगणेश यांच्यावर कारवाई केली.