अबुधाबी
संयुक्त अरब अमिरात हा देश आता वीजनिर्मितीकरीता कचऱयाचा वापर करणार असल्याची माहिती आहे. यासाठी एका यंत्राच्या निर्मितीवर काम सुरू असल्याचे समजते. संयुक्त अरब अमिरातीत सध्या कचऱयाचे डोंगर साठत असून त्याची विल्हेवाट लावण्यासह विजेच्या समस्या भेडसावत आहे. यावर उपाय शोधण्याचे काम देशाने केले आहे. एक यंत्रोपकरण बनवले जात असून त्यात कचरा घालून पेटवून त्यातून ऊर्जा निर्मितीचा प्रयोग केला जात आहे. म्हणजेच कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोग केला जात आहे. तेल निर्यात करणाऱया देशाकडून यायोगे कचऱयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे बोलले जात आहे. गॅसवर तयार होणाऱया वीजनिर्मितीवरचा भार याने काहीसा हलका होणार आहे. पहिले यंत्रोपकरण शारजात तयार होत आहे. यावर्षी याचे काम पूर्ण होण्याची शक्यता सांगितली जात आहे. याचा वापर सुरू झाल्यावर वर्षाकाठी 3 लाख टन कचऱयाची विल्हेवाट लावली जाणार आहे.