दरम्यान, बुधवारी सकाळी पोलिस उप महानिरीक्षक परमादित्य यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहाणी केली. हल्ल्यात सहभागी गुन्हेगारांचा सिसिटीवी फुटेजच्या मदतीने शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक
केपळंगुट यो लोबो कुटुंबियांकडून सन 1932 पासून याभागातील किनारी भागात कार्यरत असलेले सौझा लोबो रेस्टॉरंट आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त म्हणून ओळखले जाते. व्यवसायिक स्पर्धेतून राजीव अरोरा यांच्याकडून छोटु नामक परप्रांतीय हॉटेल व्यवसायिक तसेच त्यांच्या भाडोत्री गुंडामार्फत हा सुनियोजित हल्ला करण्यात आल्याचा संशय असून याआधी अरौरा आणि त्यांच्या गुंडाकडून दोनवेळा येथील रेस्टॉरंटवर भ्याड हल्ला करण्यात आल्याची माहिती लोबो पती-पत्नीने प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. दरम्यान, स्थानिक सौझा लोबो या गोमंतकीय कुटुंबावर वर्षाभरात तीनवेळा भ्याड हल्ला करून त्यांना त्यांच्या कौटुंबीक व्यवसायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱया राजीव अरौरा तसेच त्यांच्या भाडोत्री गुंडांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नाडीस तसेच माजी सरपंच एन्थ?नी मिनेझीस यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. सदरचा भ्याड हल्ला पाहाता राज्यातील कायदा तसेच सुव्यवस्था पुर्णपणे बिघडल्याचे द्रुष्टीस पडत असल्याचे फर्नाडीस यांनी यावेळी सांगितले. येत्या 31 डिसेंबर पर्यत या हल्ल्यातील संशयित आरोपींना गजाआड करुन सौझा लोबो कुटुंबियांना न्याय न दिल्यास मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरण्याचा गंभीर इशारा यावेळी आग्नेलो फर्नाडीस यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, कळंगुटात यापुढे कुठल्याही परिस्थितीत डान्स बारना परवानगी न देण्याची मागणी फर्नाडीस यांनी केली. स्थानिक राजकारण्यांचे पाठबळ आणि कळंगुट पोलिस स्थानकाचे निरिक्षक नोलास्को रापोझ यांच्या तपास कामातील हलगर्जीपणामुळेच लोबो कुटुंबियांवर सतत हल्ले होत असल्याचे फर्नाडीस यांनी सांगितले. गोमंतकीय माणसाची त्याच्या स्वताच्या भुमीतच अशा प्रकारे परवड होत असतांना राज्य सरकारला सत्तेत राहाण्याचा बिलकुल अधिकार नसून येत्या एक दोन महिन्यातच जनता सरकारला त्याची योग्य जागा दाखवून देणार असल्याचे माजी सरपंच एन्थ?नी मिनेझीस यांनी सांगितले. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते सुदेश मयेंकर तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून संशयितांना तात्काळ गजाआड करण्याची वेगवेगळय़ा निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्याशी मागणी केली आहे.. ..