उदय सावंत/ वाळपई :
सत्तरी तालुक्मयात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे पारंपरिक गौरी पूजनाचा कार्यक्रम सत्तरी तालुक्मयात गेल्या दोन दिवसांपासून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात महिला भगिनी भाग घेत असून वेगवेगळय़ा गावांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या पद्धतीने हा पारंपारिक उत्सव साजरा करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून रूढ झालेली आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा गावांमध्ये यंदा पुजण्यात आलेल्या गणेश बाप्पांच्या मूर्तीचे पाच दिवसानंतर थाटात विसर्जन करण्यात आले.
सामाजिक अंतराची अंमलबजावणी करून गणेश विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती वेगवेगळय़ा गावातून उपलब्ध झालेली आहे .
यंदा जागतिक स्तरावर कोवीड रोगाची महामारी वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तसेच तालुक्?यातील बहुतांश गावांमध्ये पाच दिवसात गणेश चतुर्थी साजरी करून त्यानंतर गणेश बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
आरत्या भजन आटोक्यात
गेल्या अनेक वर्षापासून गणपती विसर्जन त्याचप्रमाणे गावातील देवस्थानांमध्ये गणपती बाप्पांच्या मुर्त्या आणून मोठय़ा प्रमाणात भजन व आरती यांचा कार्यक्रम होत असतो. जवळपास दोन ते अडीच तास या आरत्या व भजन करण्यात येत असतात. यंदा मात्र हा कार्यक्रम आटोक्मयात करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे .
फक्त आरत्या करुन गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. अनेक गावांमध्ये गणपती बाप्पाच्या मुर्त्या ठेवून नागरिकांनी देवस्थानांमध्ये गर्दीला फाटा दिला .त्यामुळे सामाजिक अंतराचे कोणत्या प्रकारचे उल्लंघन झाले नाही.
फटक्मयांची आतषबाजी कमी प्रमाणात
गणेश चतुर्थी हा आनंदाचा सोहळा
या पाच दिवसात गणपती पूजनात मोठय़ा प्रमाणात दारूकामाची आतषबाजी होत असते . यंदा मात्र अवघ्या पद्धतीने फटाक्मयांची आतषबाजी पहावयास मिळाली. कोरोना रोगाची महामारी व सरकारने गणेश चतुर्थी साजरी करण्यावरून अनेक प्रकारचे लावलेले निर्बंध त्याच्या पार्श्वभूमीवर यंदा फटाक्मयांची मजा लुटण्यात पासून गणेश भक्तांना वंचित राहावे लागले. त्यामुळे अनेक गावांमध्ये अवघ्याच पद्धतीने दारूकामाची आतषबाजी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गौरीपुजनाचा पारंपरिक उत्सव साजरा
गणेश चतुर्थी साजरी करीत असताना याचा महत्त्वाचा भाग म्हणजे गौरी पूजनाचा कार्यक्रम. सत्तरी तालुक्मयांमध्ये पारंपारिक पद्धतीने गौरी पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्याची पद्धत गेल्या शेकडो वर्षांपासून रूढ झालेली आहे. गावातील महिला भगिनी याकार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेत असतात .यंदाही गौरी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. मात्र सामाजिक अंतरांचे भान ठेवून महिला भगिनींनी हा पारंपारिक उत्सव साजरा केल्याचे समजते. या पारंपारिक उत्सवाला काही प्रमाणात मर्यादा घालूनच आनंदाचा उत्सव साजरा केला. गौरी म्हणजे गणपतीची माता. त्याची सेवा करून महिला भगिनी हे वेगळय़ा प्रकारचे व्रत साजरा करण्याची पद्धत सत्तरी तालुक्मयामध्ये प्रचलित झालेली आहे. खास करून महिला भगिनीसाठी हा सोहळा अत्यंत आनंदाचा उत्साहाचा असतो. यासणात महिला भगिनी मोठय़ा प्रमाणात भाग घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. जलस्वरूपात गौरी पूजनाचे पारंपारिक पूजन म्हणजे गौरी पूजनाचा कार्यक्रम असतो .यंदा अशाच प्रकारे हा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात साजरा केल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते .काही गावांमध्ये पाचव्या दिवशी तर काही गावांमध्ये सहाव्या दिवशी हा गौरी पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.