सोनशी डोंगराला आग लागून जैविक संपत्तीची हानी
उदय सावंत/सोनशी.
सत्तरी तालुक्यात आठ दिवसापासून सुऊ असलेले आगीचे प्रकरण थांबता थांबेना. दोन दिवसांपासून पुन्हा एकदा वेगवेगळ्dया ठिकाणी आगीचे भडके निर्माण होऊ लागलेली आहेत. शुक्रवारी संध्याकाळी होंडा सोनशी येथील खाण परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली. यात जैविक संपत्तीचे हानी झालेली आहे तर शनिवारी सकाळी कोपार्डे येथील एका डोंगराला भयंकर आग लागली. स्थानिक ग्रामस्थांनी सरकारी यंत्रणेच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आणली. यामुळे कोपार्डे भागातील ग्रामस्थांचे व तऊणांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सत्तरी तालुक्यामध्ये आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. यामुळे सरकारची यंत्रणा हतबल झालेली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एका डोंगराची आग आटोक्यात येताच दुसऱ्या डोंगराला आग लागण्याचे प्रकार घडू लागलेले आहेत. यामुळे स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरकारी यंत्रेकडून करण्यात येत आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सोनशी डोंगराला आग
शुक्रवारी संध्याकाळी सोनशी येथील खाण परिसरातील डोंगराला आग लागली. याची माहिती वाळपई अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा वणवा प्रचंड प्रमाणात होता. यामुळे शेवटी डिचोली अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचरण करण्यात आले. वाळपई व डिचोली अग्निशामक दलाच्या यंत्रणेने युद्धपातळीवर काम करून रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. यामध्ये मोठ्या प्रमाणात जैविक संपत्तीचे हानी झालेली आहे. खाण परिसरामध्ये जमिनीची धूप रोखण्यासाठी लावलेली झाडे आगीत जळून खाक झाली.
शुक्रवारी संध्याकाळी सदर भागातील आग पूर्णपणे विझली होती. मात्र शनिवारी दुपारी पुन्हा एकदा होंडा परिसरातील आजोबा देवस्थानच्या पलिकडेच फोमेन्तो कंपनीच्या परिसरामध्ये आगीचा वणवा पेटला. यामुळे पुन्हा एकदा अग्निशामक दलाच्या यंत्रणेने काम सुरू केलेले आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याच्या काम सुरू होते. खाणीचा परिसर धोकादायक असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कोपर्डे डोंगरावर आग
शनिवारी दुपारी कोपर्डे येथील देवसू डोंगराला आग लागल्याचा प्रकार घडला. याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर ताबडतोब माहिती वनखात्याच्या यंत्रणा देण्यात आली. नारायण गावस यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी चांगली मदत केली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांबरोबरच अग्निशामक दलाची यंत्रणा, वाळपई मामलेदार कार्यालयाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी संयुक्तरित्या काम करून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डोंगरावरील आग आटोक्यात आणली. आगीमुळे काही काजू उत्पादकांच्या काजू बागायती नष्ट झालेल्या आहेत. त्यांना आर्थिक स्तरावर फटका बसलेला आहे.
गावचे पंच सयाजी सावंत व राधिका सावंत यांनी आग विझविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. ते सातत्याने सरकारी यंत्रणेशी संवाद साधून होते. यामुळे आग आटोक्यात आणण्यात महत्त्वाची मदत झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
दरम्यान वन खात्याचे नारायण गावस यांनी सांगितले की, कोपर्डे डोंगरावर अचानकपणे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब कर्मचाऱ्यांना घेऊन आपण घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कोपार्डे गावातील ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात तऊणांनी या आग विझविण्याच्या मोहिमेमध्ये भाग घेतला. यामुळे त्यांनी तऊणांचे अभिनंदन केले. मोर्ले तऊणानंतर कोपार्डे गावातील दिलेले योगदान हे अत्यंत महत्त्वाचे होते.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार डॉ देविया राणे यांच्याकडून कौतुक
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. देविया राणे यांनी कोपर्डे ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी दिलेले योगदान हे खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रत्येक गावातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी असे योगदान द्यावे. आज सत्तरी तालुक्यातील जैविक संपत्ती धोक्यात आलेली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. यामध्ये मोर्ले गावानंतर, कोपार्डे गावातील युवकांनी दिलेले योगदान हे खरोखरच वाखण्याजोगे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.