सदलगा/ प्रतिनिधी
सदलगा येथील 64 वर्षाच्या कोरोना बाधीत वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे आज निष्पन्न झाले. गेल्या आठवडय़ापासून हि व्यक्ती येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होती. इथल्या डॉक्टरांना संशय आल्याने सरकारी दवाखान्यात पुढील उपचारास जाण्यास सांगितले होते, तिथून या व्यक्तीस चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात उपचारास हलविण्यात आले, तिथे या व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याने काल 28 जुलै रोजी समजले. आज 29 जुलै रोजी पहाटे या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती मृत झाल्याचे कळले.त्या व्यक्तीच्या घरातील दोन आणि नगरपाfरषदेतर्फे दोन व्यक्तींना पीपीई किट घालूनच या मृत व्यक्तीवर अंतीम संस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रसन्न कल्याणशेट्टी, महसूल अधिकारी एम. ए. नागराळे सहाय्यक, आणि नगरपाfरषदेकडून सांगण्यात आले. पाfरसर सा@निटाझर करुन सीलडाऊन करण्यात आला.