कुडाळ / प्रतिनिधी-
सनदी लेखापाल परीक्षेत (सी. ए) वेतोरे कराडेवाडी येथील धनश्री संदेश प्रभूखानोलकर हीने डिसेंबर 2021 द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय), कडून घेण्यात आलेल्या सी ए फायनल परीक्षेत उज्वल यश संपादित केले. तीने गोव्यातून ही परीक्षा दिली होती. तीचे या यशाबद्दल कौतुक होत आहे. तीने यापूर्वी बी. काँम. एम. काँम. परीक्षेत यश मिळविले आहे. सौ. प्रभूखानोलकर या एस टि महामंडळातील कुडाळ सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक जयू प्रभुखानोलकर आणि सौ. कांचन प्रभूखानोलकर यांची ती सून होय. तिचे पती संदेश प्रभूखानोलकर हे सुद्धा सी ए आहेत.