कर्नाटक सफाई कर्मचारी परिषदेच्या सभेत निर्णय : शासनदरबारी पाठपुरावा करणार
प्रतिनिधी /बेळगाव
सफाई कर्मचाऱयांच्या समस्या जाणून घेऊन सरकार दरबारी मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव कर्नाटक सफाई कर्मचारी परिषदेच्या सभेत करण्यात आला. राज्यातील सफाई कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी कामगारांच्या समस्या यावेळी मांडल्या. कर्मचारी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली.
राज्यातील सफाई कर्मचाऱयांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कर्नाटक सफाई कर्मचारी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेची सभा मंगळवारी भाग्यनगर येथील प्रशिक्षण सभागृहात आयोजित केली होती. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य जगदीश हिरेमनी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. परिषदेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱयांच्या समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे या सभेवेळी राज्यामधून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांनी समस्यांची माहिती दिली.
सफाई कर्मचाऱयांना निर्माण होणाऱया समस्या मांडण्यात आल्या. तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजरबाबत तक्रारी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे कर्मचाऱयांना सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत, अशा विविध समस्या मांडण्यात आल्या. या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला.
या सभेवेळी ऊर्जामंत्री सुनीलकुमार, इंधन विभागातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण आदींसह परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.