प्रतिनिधी /पणजी
कुंभारजुवे मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांचे गेली 20 वर्षे खंदे समर्थक असलेले आणि नुकतीच त्यांची साथ सोडून भाजपमधून बाहेर पडलेले समिल वळवईकर यांनी मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आणि काँग्रेस पक्षाने ऑफर दिल्याने काँग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुकवार 3 रोजी दुपारी 3.30 वाजता वळवईकर येथील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
सत्ताधारी भाजप पक्षाचा कार्यकर्ता असूनही लोकांची त्यांना लोकांची कामे करुन देणे शक्य होत नव्हते, म्हणून त्यांनी भाजपमधील सर्व पदांचा तसेच कदंब महामंडळ संचालकपदाचा त्याग करुन त्यांनी अलिकडेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह अन्य पदांचाही राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते काणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे कुंभारजुवे मतदारसंघातील कार्यकर्ते, तसेच मतदारांचे लक्ष लागून राहिले होते. उद्या ते काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश करणार आहेत.