प्राप्त अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
जिल्हा पंचायत निवडणूक झाल्यानंतर प्रथमच मडगाव येथील जिल्हाधिकाऱयाच्या कार्यालयामध्ये जिल्हा पंचायत सदस्यांची बुधवारी पहिली बैठक घेण्यात आली होती. ही बैठक दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अनेक सदस्य नवीन असल्याने यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पंचायतींना 14व्या वित्त आयोगच्या माध्यमाने निधी येते त्याच पद्धतीने जिल्हा पंचायतीला 15व्या वित्त आयोगातून 7.50 कोटी रुपये मंजूर झाले आहे. त्यातील एक कोटी चाळील लाख रुपये पहिला हप्ता म्हणून प्राप्त झालेले आहे असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडूलकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
सरकारतर्फे 15व्या वित्त आयोगच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीमुळे यावेळी पंचायत सदस्यांनी सरकारचे आभार मानलेले आहे. या निधीतुन आम्ही कोणती कामे करु शकतात, या संदर्भात आम्हाला सरकारर्फे पत्र आलेले असून त्यानूसार आम्ही कामे करणार आहोत. बोरी येथील सर्कल लहान करावे यासाठी एक ठराव मांडण्यात आलेला आहे. तसेच सदस्यांनी मांडलेल्या इतर समस्याही संबंधित खात्याकडे पाठवून त्या सोडवल्या जातील असे अध्यक्ष तेंडुलकर म्हणाल्या.