कळंगूटमध्ये भव्य मिरवणूक काणढय़ात येईल : शिवप्रेमींचा पत्रकार परिषदेत इशारा
प्रतिनिधी / म्हापसा
सबंध राज्यात शासकीय पातळीवर सरकारी पैशांनी साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंती निमित्ताने कळंगुटात आयोजित मिरवणूक अडवून स्थानिक राजकारण्यांनी आपले खरे रूप उघड करून दाखविले आहे. मात्र येत्या 31 मार्चला राज्यभरातील शिवप्रेमी तिथीनुसार शविजयंती साजरी करणार असून सरकारने अडवले तरी म्हापसा ते कळंगूट अशी यशस्वी मिरवणूक काढून दाखविणार असल्याची भिमगर्जना शिवप्रेमी राजेंद्र वेलिंगकर यांनी कळंगुट येथे बोलताना केली. दरम्यान ही मिरवणूक पुढे अडविण्याचा प्रयत्न झाला तर पुढील रूपरेषा काय असेल याचा निर्णय त्याचवेळी शिवप्रेमी घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आवला.
श्री. शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत वेलिंगकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश नाईक, कळंगूट शिवाजी महाराज स्मारक समितीचे गुरुदास शिरोडकर, परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर, सत्तरी जागृत युवा मंचचे रणजीत राणे, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर राव, सामाजिक कार्यकर्ते सुदेश तिवरेकर, गौरेश गांवस, आनंद मांद्रेकर, जयेश नाईक, स्वरूप नाईक, रवी हरमलकर, आनंदराव देसाई, विश्वेष प्रभू, अभय सावंत, अंकीत साळगावकर तसेच अमित झा आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वेलिंगकर म्हणाले की, आम्ही सरकारी पातळीवर सर्वत्र कगदी पत्रव्यवहार केला असून या मिरवणुकीला सर्व संबंधित खात्यामध्ये परवानगीही मागितली आहे. अद्याप परवानगी मिळाली नसली तरी सोमवारपर्यंत सरकारचा अंतिम निर्णय आम्हाला कळणार आहे. जर ही परवानगी सरकारने नाकारली तर याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जबाबदार राहणार आहेत. सरकारने नाहक शिवप्रेमीच्या आड येऊ नये. आम्ही आजपर्यंत शांततेचा मार्ग स्विकारला आहे. पुढे जाऊन काय होईल हे सांगता येत नसले तरी याला संपूर्ण जबाबदार स्थानिक नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राहणार आहेत असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान 19 फेब्रुवारीला कळंगुटात आयोजित शिवजयंती उत्सव मिरवणूक अडविण्यामागे स्थानिक आमदार तथा भाजप सरकारातील प्रमुख मंत्र्यांमध्ये सहभाग असलेल्या मायकल लोबो यांचा हात असल्याचे आता उघड झाले असल्याचा आरोप राजेंद्र वेलिंगकर यांनी यावेळी केला. सध्याचा कोविड महामारीचा काळ लक्षात घेता तसेच कोविड नियमांचे कुठल्याही प्रकारचे उल्लंघन न करता येत्या 31 मार्चला संपूर्ण राज्यातील शिवप्रेमींतर्फे म्हापसा ते कळंगूट अशी शिववाहन भव्य तसेच ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
म्हापसातील श्रीदेव बोडगेश्वर देवस्थानच्या प्रांगणातून 31 मार्चला सुरू होणारी शिवजयंती मिरवणूक पर्रा मार्गे कळंगूट (शांतादुर्गा देवस्थान) आणि त्यानंतर साळगांव येथून पुन्हा म्हापसा असा मार्गक्रमण करणार आहेत. राज्यातील बाराही तालुक्यातील शिवसंघटणांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती वेलिंगकर यांनी यावेळी दिली. येत्या बुधवारी म्हापशाहून निघणारी शिवजयंती वाहन मिरवणूक ऐतिहासिक स्वरुपाची होणार असल्याचे राजेंद्र वेलिंगकर यांनी शेवटी सांगितले.
मिरवणूक अडविण्याचा प्रयत्न झाल्यास शिवप्रेमी निर्णय घेणार
यावेळी माजी राज्य प्रमुख रमेश नाईक, कळंगूट शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर राव, राजेंद्र कोरगांवकर, सलमान खान यांनी आपले विचार मांडताना आज राष्ट्रीय स्वयं सेवकचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आहे. आम्ही शिवजयंती पाकिस्तानमध्ये साजरी करावी, पॅसिनो बंद नाही तर शिमगोत्सव बंद का. यामागचे कारण म्हणजे शिवजंयती राज्यात साजरी करू नये. आम्ही संघटना चालवतो मात्र बारा तालुक्यातून जो आवाज झालवा आहे त्यासाठी सर्वजण एकत्रित येणार आणि आम्ही आवाज उठविणार आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करणार आसल्याचे यावेळी सांगण्यात आले. आम्ही शांततेत ही मिरवणूक करणार असून येथे शांतता बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास पुढील निर्णय शिवप्रेमीचा असेल असे यावेळी सांगण्यात आले. अभय सामंत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सुदेश तिवरेकर यांनी मानले.