ऑनलाईन टीम / मुंबई :
अनेक दोषींना फाशी, जन्मठेप शिक्षेपर्यंत नेणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच बायोपिक येणार आहे. दिग्दर्शक उमेश शुक्ल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या बायोपिकमधून त्यांच्या जीवनातील अनेक घडामोडींचा उलघडा होणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘निकम’ असे असणार आहे. कथेचं लेखन भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत. तर उमेश शुक्ला, सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया चित्रपटाचे निर्माते आहेत.
दरम्यान, या चित्रपटा बद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, माझ्यावर पुस्तक आणि चित्रपट तयार करण्यासाठी काही वर्षांपासून अनेकजण मागे लागले आहेत. यासाठी माझी बिलकूल इच्छा नव्हती. कारण माझ्यावर अनेक पीडित लोकांची मोठी जबाबदारी आहे. पण प्रतिभाशाली टीमसोबत भेट झाल्यावर मी या चित्रपटासाठी तयार झालो. मला विश्वास आहे की, माझी कथा व्यवस्थित या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली जाईल.