देखभाल केली जात नसल्याने दुरवस्था : गॅलरीचा वापर अवैध कामासाठी : नागरिकांतून तीव्र नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
कॉलेज रोडवरील सरदार्स हायस्कूल मैदानात 1 कोटी खर्च करून प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. मात्र याची देखभाल केली जात नसल्याने दुरवस्था निर्माण झाली आहे. मैदानाच्या आवाराचा वापर अवैध कामासाठी व मद्यपानासाठी केली जात असून परिसरात मद्याची पाकिटे टाकण्यात येत आहेत. परिणामी मैदानावर फिरण्यास जाणाऱया नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोटी रुपये खर्च करूनही मैदानाची अशी अवस्था झाल्याने 1 कोटी पाण्यात गेल्याची प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
सरदार्स मैदान म्हणजे क्रिकेटपटूंसाठी हक्काचे मैदान असून सध्या बेळगावात इतक्मया मोठय़ा आकाराचे क्रिकेटसाठी हे एकमेव मैदान शिल्लक राहिले आहे. त्यामुळे या मैदानावर नेहमीच क्रीडापटुंची खेळण्यासाठी गर्दी असते. तर सकाळ व संध्याकाळी वॉकींगसाठीही या मैदानाचा वापर होत असतो.
यामुळे क्रिडापटुंना सोयीचे ठरावे या दृष्टीने मैदानावर सुमारे 1 कोटी खर्चातून प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. मात्र या गॅलरीचा वापर चांगल्या कामासाठी होण्याऐवजी रात्रीच्या वेळी अवैध कामासाठी होत आहे.
तर गॅलरीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाल्याचे अनेक क्रिडापटुंचे म्हणणे आहे. तसेच गॅलरीला गळती लागल्याने याठिकाणी असलेल्या गाळय़ांमध्ये पाणी पाझरत असते. तसेच पेव्हर्सचे काम अर्धवट असल्याने साहित्य पडून आहे. मैदानाचे प्रवेशद्वार कायम खुले रहात असल्याने दुरूपयोग वाढला आहे. तसेच गाळय़ांना बसविण्यात आलेल्या खिडक्यांची मोडतोड करून नुकसान करण्यात आली आहे.
या परिसरात रात्रीच्यावेळी मैदानाचा दुरूपयोग करणाऱयाची संख्या वाढली असून परिसरात मद्याच्या बाटल्या व पाकिटे साचत आहेत. तसेच स्वच्छता केली जात नसल्याने कचरा साचला आहे. त्यामुळे या परिसराची देखभाल करण्यासाठी मनपाने कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे कोटीचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या मैदानातील गॅलरीचा दुरूपयोग होत आहे. या परिसराची देखभाल करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.