प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्या येथे बुधवारी ऐतिहासिक राममंदिरासाठी भूमिपूजन करण्यात आले. या आनंदाप्रित्यर्थ सराफ गल्ली येथील श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुनील बाबली यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
2001 मध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सराफ गल्ली येथील सर्व नागरिकांनी ‘श्री राम जय राम जय जय राम’ या मंत्राचा जप सलग 45 दिवस रात्री 8 ते 10 या वेळेत केला होता. त्यामध्ये प्रामुख्याने अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे, अशी अपेक्षा करण्यात आली होती. त्याची फलश्रुती बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी झाली. या निमित्त सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नरेश पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी युवक मंडळाचे विनायक चौगुले, गौरव बाबली, मदन विक्रांत व गोविंद लाड, संतोष बाबली, अनिकेत चौगुले, परशराम इंजल, यल्लाप्पा कारेकर, नारायण किटवाडकर, राजू मोदगेकर, श्रीकांत माने, विनायक जाधव, अजित भादवणकर, संजय मोदगेकर आदी उपस्थित होते.