प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाकाळात सफाई कर्मचारी अखंड राबत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात त्यांचा हातभार मोलाचा आहे. हे लक्षात घेऊन सर्वलोकसेवा फौंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱयांना मास्क देण्यात आले. याचवेळी फौंडेशनचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांनी कोरोनाकाळात कशी काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. आरोग्य निरीक्षक पुंडलिक राठोड यांनीसुद्धा स्वच्छतेबद्दल सूचना केल्या. कोरोनाकाळात मास्क परिधान करणे आणि सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.