हेस्कॉमची नेहमीचीच डोकेदुखी, पेमेंट करतानाही येताहेत अडचणी
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमचा सर्व्हर डाऊन होण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागील 3 वर्षांपासून सर्व्हरमध्ये समस्या जाणवत आहेत. सर्व्हर बंद असला की, सर्वच कामे खोळंबली जातात. पेमेंट करताना अडचणी येत असल्याने बिल भरण्यासाठी आलेल्या नागरीकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे ही तांत्रिक समस्या हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांनी सोडवावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.
हेस्कॉम कार्यालयात गेल्यानंतर कोणतेही काम करताना सर्व्हरची आवश्यकता ही भासतेच. हेस्कॉममध्ये मागील 3 वर्षांपासून सर्व्हर डाऊनची समस्या सतावत आहे. तक्रारी करूनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. इन्फोसिस कंपनीकडे सर्व्हर पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु या सर्व्हरमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊनचा केवळ नागरीकांनाच नाही तर हेस्कॉम कर्मचाऱयांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्व्हर डाऊनमुळे नवीन कनेक्शनसह इतर सर्वच कामे खोळंबली जात आहेत. अपार्टमेंटला विजप्रवाह मंजुरी देणे, टेंम्पररी मिटरींग, पेमेंट करणे यासह इतर कामे खोळंबली आहेत. त्यामुळे चांगल्या सर्व्हीस देणाऱया कंपनीकडून सर्व्हर घ्यावा अशी मागणी ग्राहक करीत आहेत.
एम. डींकडून निव्वळ धूळफेक
हेस्कॉमच्या एम. डी. भारती डी. या बेळगावमध्ये आल्या असताना सर्व्हर डाऊनची समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही तांत्रिक सदस्या जानेवारी 2022 पर्यंत सोडविली जाईल असे आश्वासन कॉन्ट्रक्टर असोसिएशनला दिली होती. परंतु फेब्रुवारी उजाडला तरी अद्याप जुनेच सर्व्हर सुरू असून त्यामध्ये समस्या येतच आहेत. त्यामुळे ही केवळ धूळफेक होती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.