प्रतिनिधी/ पणजी
राज्यात काल सलग दुसऱया दिवशीही कोरोनाबाधित रुग्णांनी पाचशेचा आकडा पार केला. काल 547 नवे कोरोनाबाधित सापडले तर कोरोनामुळे तिघा रुग्णांचा बळी गेला. सक्रिय रुग्णांची संख्या 3646 झाली असून काल 433 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 178 झाली आहे.
शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. मडगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 482, वास्कोत 239, फोंडय़ात 266, म्हापशात 179, पणजी 167, डिचोलीत 68, सांखळीत 111, पेडणेत 113, वाळपईत 107, हळदोणात 81, बेतकीत 68, कांदोळीत 74, कासारवर्णेत 31, कोलवाळमध्ये 99, खोर्लीत 136, चिंबलमध्ये 106, शिवोलीत 72, पर्वरीत 197, मयेत 48, कुडचडेत 91, काणकोणमध्ये 76, बाळ्ळीत 48, कासावलीत 101, चिंचिणीत 31, कुठ्ठाळीत 69, कुडतरीमध्ये 95, लोटलीत 65, मडकईमध्ये 40, केपेत 111, सांगेत 35, शिरोडामध्ये 72, धारबांदोडामध्ये 52 तर नावेलीची रुग्णसंख्या 108 झाली आहे.