प्रतिनिधी / सांखळी
सांखळी शहरातील लोकमान्य सोसायटीच्या शाखे तर्फे गणेश जयंती निमित्त परिसरातील जे÷ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला सांखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते
लोकमान्य मलटीर्पपज को, ऑप सोसायटी ही देशातील अग्रणी पातसंथा असून संथापक किरण ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेने हल्लीच रोप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे सुरक्षितता, पारदर्शकता, विश्वाससारता,व्यावसायिकता ही चतुःसुत्री आव्हान स्वीकारून, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीअश्या चार राज्यातून 217 शाखा कार्यरत आहेत गोमंतकीय लोक विश्वासास पात्र ठरलेल्या आपल्या या संस्थेने साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विविध प्रकारच्या कलागुणांना वाव देणाऱया कार्यक्रम चे यशस्वी आयोजन केले आहे आपल्या संस्थेच्या अनेक लोकं उपयोगी यौवजना आहे त्याचा लाभ अवश्य घ्या अधिक माहिती साठी जवळच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखा प्रमुख कडे संपर्क साधा अशी माहिती यांनी स्वागतपर बोलताना दिली
या वेळी प्रमुख अतिथी गोव्यातील प्रथम महिला समाज सेविका सुलक्षणा प्रमोद सावंत व्यवस्थापन अधिकारी अनथोनी आझयेदो, कार्यक्रम अधिकारी गोविंद काळे, सांखळी व्यवस्थापन अधिकारी रामकृष्ण पिळगावकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष शेलेंद्र काणेकर याची व्यासपिठावर उपस्थिती होती,समई पेटवून कार्यक्रम ची सुरवात करण्यात आली,गुलाब पुष्प देऊन स्वागत गायत्री नाईक यांनी केले
गणेश जयंती निमित्त लोकमान्य सोसायटी तर्फे सांखळी परिसरातील शिक्षक गणपत पावसकर, गजानन शेटय़?, सुलभा काणेकर, सुभाष गोवेकर, बाळकृष्ण पाटील, संतोष भगत, नीलिमा अलवरीस, सिंतीया प्रेंडाणडीस,नारायण आरोलकर, बाबल मळी क ,पुरुषोत्तम दामले, मधुबाला काणेकर, सुरेखा देसाई यांचा फुलझाड आणि लोकमान्य टिळक यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला
प्रत्येक माणसांनी जीवनाचे नियोजन करण्यातसाठी लोकमान्य सारख्या सोसायटीचे सहकार्य घ्या : सुलक्षणा सावंत
आपण जीवनात नेहमीच वरच्या वर विचार करत असतानाच आयुष्य चांगले सुखकारक घालवण्यासाठी आथिर्क सक्षम होणे काळाची गरज आहे आपले आयुष्य कधी संपेल हे कोणतेही सांगू शकत नाही तेव्हा प्रत्येक माणसाने आपल्या भविष्याचा विचार करून लोकमान्य सारख्या सोसायटीच्या योजनांचा लाभ घेऊन त्याचा उपयोग करून घ्या असे मत समाज सेविका सुलक्षणा सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले तसेच शिक्षण क्षेत्रात बदल असलेतरी शिक्षणात शरीराच्या प्रत्येक अंगाचा उपयोग झाला पाहिजे ऑनलाइन शिक्षण हे मर्यादित स्वरूप असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला पुढे जाण्याची किती घाई असली तरी शिक्षक आणि आई वडिलांचा आदर करणे हे आपलं कर्तव्य आहे असेही सावंत म्हणाल्या कार्यक्रम चे सुत्र संचालन प्रणाली काणेकर यांनी केले तर रामकृष्ण पिळगावकर यांनी आभार मानले