प्रतिनिधी / सांगली
सोमवारी जिल्हय़ात कोरोनाचे नवे 121 रूग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ातील एकूण रूग्णसंख्या आता 1762 वर पोहचली आहे. तर जिल्हय़ातील सहा जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे एकूण बळीची संख्या 57 झाली आहे. महापालिका क्षेत्रात 97 तर ग्रामीण भागात 24 नवीन रूग्ण वाढले आहेत.
सांगली-मिरजेत कोरोनाचा कहर सुरू आहे
सांगली-मिरजेत कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. दररोज मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून येत चालले आहेत. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱयांचा कोरोनाने बळी गेल्याने महापालिकेकडे असणाऱया 50 वर्षावरील कर्मचाऱयांची रॅपीड ऍण्टीजन टेस्ट करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले होते. त्यानुसार सकाळपासून या कर्मचाऱयांचा दोन ठिकाणी मेडिकल कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये आणखीन चार कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सांगली शहरातील दोन आणि मिरज शहरातील दोघांचा समावेश आहे. सांगली शहरातील sिवश्रामबाग येथे तीन हनुमाननगर येथे 12 तर विविध भागात मात्र जामवाडी परिसरात एक आणि गावभागात तपासणी करण्यात आली यामध्ये गावभागात कुंभारखिंड येथेच दहा जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सांगली शहरात नवीन 49 रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात समतानगर येथे चार, इदगाहनगर येथे 13 इंदिरानगर येथे चार आणि मिरज अर्बन नागरी केंद्राजवळ पाच असे एकूण 39 जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय कुपवाड येथील माजी नगरसेवकांच्या संपर्कातील आणखीन नऊ जण बाधित आढळून आले आहेत. असे एकूण नवीन 97 रूग्ण महापालिका क्षेत्रात वाढले आहेत.
ग्रामीण भागात 24 रूग्ण वाढले
आटपाडी येथे दोन, निबंवडे येथे एक बालेवाडी येथे एक आवळाई येथे एक असे आटपाडी तालुक्यात पाच रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात अंकली येथे तीन, हरीपूर येथे दोन, भेसे येथे एक असे तालुक्यात सहा रूग्ण वाढले. जत शहरात तीन आणि मुचंडी येथे तीन असे जत तालुक्यात एकूण सहा रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात विटा येथे एक, वाळवा तालुक्यात ताकारी येथे एक आणि पलूस तालुक्यात पलूस येथे एक असे 20 रूग्ण वाढले आहेत.
उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू
सांगली शहरातील महापालिकेच्या 55 वर्षीय सफाई कर्मचाऱयाचा कोरोनाचे उपचार सुरू असताना भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील बेडग येथील 47 वर्षीय व्यक्तीचा मेहता हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरातील 87 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरज येथील 35 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे तर मिरज तालुक्यातील पद्माळे येथील 56 वर्षीय व्यक्ती आणि जत येथील 72 वर्षीय महिला यांचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 57 बळी गेले आहेत.
तब्बल 81 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात सोमवारी जरी रूग्ण वाढले असले तरीसुध्दा दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्हय़ातील उपचार सुरू असणारे 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 24 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोना योध्दय़ांनाच कोरोनाची लागण
जिल्हय़ातील महापालिकेच्या सफाई कर्मचाऱयांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आणखीन चार महापालिकेचे कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय एका पोलीसालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना योध्दय़ांनाच आता कोरोनाची लागण होत चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 1762
बरे झालेले 883
उपचारात 822
मयत 57