प्रतिनिधी/सांगली
दत्तनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे सिंहगड किल्ल्याची तब्बल २५ फुटी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या किल्ल्याचे उद्घाटन माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते भाजपा महिला मोर्चा, सांगली जिल्हाध्यक्षा नगरसेविका ॲड. स्वातीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
हा संपूर्ण किल्ला दगड आणि मातीपासून बनविण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे प्रथमच बनविताना कोणत्याही कृत्रिम गोष्टींचा वापर हा किल्ला बांधताना करण्यात आला नाही. सांगलीकरांनी या किल्ल्यास जरुर भेट द्यावी असे आवाहन नितीन शिंदे आणि स्वाती शिंदे केले.
अजय शिंदे, अभिजीत काळे, अजिंक्य शिंदे, किशोर पाटील, पर्वत शिंदे, रुपेश पाच्छापूरकर, सचिन पाटील, नितीन देवल, राम देवल, किशोर निकम, राजू शिंदे, युवराज काळे, लिंबाजी विरकर, राजू शिंदे, चैतन्य पाच्छापुरकर, वैभव जगताप, हर्षद देशमुख, घनश्याम सहानी आदिंसह मंडळातील सदस्यांनी हा किल्ला साकारला आहे. यावेळी आदित्य पटवर्धन, गजानन मोरे, चेतन भोसले, श्रीधर मेस्त्री, ओंकार पवार, निखिल मेटकरी, अस्लम शेख आदिंस उपस्थित होते.