प्रतिनिधी / कुपवाड :
जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे नदी, ओढयाना मोठ्या प्रमाणात पुर आला होता. या पुरात जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहून गेलेले मृतदेह शोधण्यासाठी आयुष सेवाभावी संस्था संचलित आयुष हेल्पलाईन टीमने जिल्हा प्रशासनाला मोलाची मदत केली.
याबद्दल ‘कृतज्ञता” व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आयुष हेल्पलाईन टीमला सन्मानपूर्वक कृतज्ञता प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
पुरकाळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे आयुष हेल्पलाईन टीमला शोध मोहिमेसाठी पाठविले होते. यादरम्यान आयुष टीमने घटनास्थळी जाऊन मृतदेह शोधले आहेत. याबद्दल डॉ.अभिजित चौधरी यांनी आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांसह अविनाश पवार, इम्तियाज बोरगावकर, अमोल व्हटकर, अल्तमश पट्टनकुड़े, मुस्ताक बोरगांवकर, नागेश मासाळ, चिंतामणी पवार, जमीर बोरगावे, बबलू बोरगांवकर, अजित कांबळे, जाहिर मुजावर, कौसेन मुजावर, गणेश आनंदे, रितेश शेठ यांचे कौतुक केले. आयुष हेल्पलाईन टीमच्या सर्व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत केली म्हणून सर्वाना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत चौधरी यांच्याहस्ते सर्व सदस्यांना कृतज्ञता प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.