जत / प्रतिनिधी :
जत येथील जनसुराज्य पक्षाचे नेते तथा शाहुवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांचे स्वीय साहाय्यक प्रभाकर लाह्याप्पा सनमडीकर वय 59 यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले, सनमडीकर हे आंबेडकरी चळवळीतील नेते होते. शिखर बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेनंतर ते आ. कोरे यांचे पीए म्हणून कार्यरत झाले होते. 2009 साली त्यांनी जत राखीव मतदारसंघात जनसुराज्य पक्षातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
गेल्या दहा दिवसापासून ते आजारी होते, सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणजोत मावळली तसेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे