चौघांना अटक, ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / कुपवाड
कुपवाड परिसरातील चारचाकी वाहनातून डिझेल चोरी करणारी टोळी कुपवाड पोलिसांच्या पथकाने सोमवारी गजाआड केली. याप्रकरणी चौघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहीती सहा.पो.निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.
अटक केलेल्यांमध्ये संशयित जितेंद्र निवृत्ती घोडके (३१,रा.स्वामी मळा, कुपवाड), अनंत कृष्णा मेटकरी (२०), वैभव कृष्णा मेटकरी (१९, दोघेही रा.लक्ष्मीनगर, कुपवाड) व निखील महेश मागाडे (२१,रा.हडको काॅलनी, संजयनगर, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात अंकुश महादेव भंडारे (रा.स्वामी मळा) यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे.