कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडकरांच्या आरोग्य सुविधांसाठी अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या भव्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. शहरातील प्रशस्त जागेवर उभारण्यात येणाऱ्या या हॉस्पिटलचा येथील जनतेला निश्चितच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी कुपवाडमध्ये बोलताना दिली.
कुपवाड शहरातील प्रभाग एकमध्ये अवधूत कॉलनी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची पाहणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी केली. यावेळी ते कुपवाडमधील राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक आणि जनतेसोबत बोलत होते.यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.