कृषि विभागाच्या अधिकाऱयांची सांगलीत कारवाई ः संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
प्रतिनिधी / सांगली
विनापरवाना खत विक्री प्रकल्पावर कृषि विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 20 लाख 60 हजार किंमतीचा खताचा साठा जप्त केला. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱयांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱयाना जादा दराने खते विक्री करू नये, खतांचा काळाबाजार करू नये तसेच भेसळयुक्त खतांची विक्री होऊ नये यासाठी जिह्यात कृषि विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. द. ओरीअन अपार्टमेंट जुना कुपवाड रोड सह्याद्री येथे ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी (रा. सांगली) हे शेतकऱयांना व किरकोळ उत्पादकांना तसेच काही कृषि सेवा केंद्राना अनाधिकृतपणे सूक्ष्म अन्नद्रव्ये विकतात याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकारी सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी धनाजी पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱयांच्या जिह्यास्तरीय भरारी पथकाने ग्लोबल इम्पोर्टस्च्या कार्यालयावर छापा टाकला छाप्यात सुमारे 20 लाख 60 हजाराचे विनापरवाना खत जप्त केले.
यामध्ये माग्नेशीअम सल्फेट , फेरस सल्फेट , सल्फर , बोरॉन , झिंक सल्फेट, कॅल्शीयम नायट्रेट या सूक्ष्मअन्नद्रव्यांची, खतांची नमुने भरारी पथकास आढळून आली. ग्लोबल इम्पोर्टस्च्या कार्यालयाच्या शेजारील गाळा नं . 2 मध्ये कॅल्शियम नायट्रेट 2 मे.टन ( 80 पिशव्या 25 कि.ग्रा . प्रति पिशवी ) , सल्फर 99.9 टक्के 2 मे . टन ( 80 पिशव्या 25 कि.ग्रा . प्रति पिशवी ) , सल्फर 9 0 टक्के ( 9 00 कि.ग्रा.) , झिंक सल्फेट ( 400 कि.ग्रा.) . ( 16 पिशव्या 25 कि.ग्रा . प्रति पिशवी ) , फेरस सल्फेट , 2 मे.टन. ) , ( 40 पिशव्या 50 कि.ग्रा . प्रति पिशवी ) , माग्नेशीअम सल्फेट 50 कि. ग्रा . एक पिशवी , बोरॉन , 2 मे . टन ( 80 पिशव्या 25 कि. ग्रा . प्रति पिशवी ) तसेच सिलिकॉन गोळी 5 मे.टन , सिलिकॉन पावडर 10 मे.टन , हुमिक फ्लेक्स 30 मे . टन बेन्टोनेट गोळी 30 मे . टन असा एकूण तब्बल 84मे . टन 350 किलो इतका साठा ग्लोबल इम्पोर्टसच्या शेजारील गाळा नं . 2 , तसेच समोरील हमीद इमारतीच्या तळघरात व तिरुमला पार्क गाळा नं . 5 पत्ता लवली सर्कल रोट सांगली येथे आढळून आला. मुद्देमाला पैकी सूक्ष्मअन्नदव्ये अंदाजे किमत रु 4,10,600 व इतर अनुषंगिक मुद्देमाल अंदाजे किमंत रु . 16.50,000 अशी एकूण अंदाजे रक्कम रु . 20,60,600. ग्लोबल इम्पोर्टस्चे मालक तोसिफ नसीर मार्फानी रा. सांगली यांच्या कडे भरारी पथकाने विक्री परवाना व खरेदी पावत्या मागणी केली असता त्यांनी सादर केले नाही.
अधिक चौकशी अंती कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुक्ष्मअन्नद्व्यापैकी फेरस सल्फेट , सल्फर , बोरॉन , झिंक सल्फेट, कॅल्शीयम नायट्रेट वा सुक्ष्मअन्नद्रव्याचे. खतांचे संशयित नमुने सर्व पंचा समक्ष व स्वत : मालक यांचे समोर घेऊन ते सिलबंद करून संबंधित विनापरवाना खताचे नमुने शासकीय खत तपासणी प्रयोगशाळा येथे तपासणी करिता सादर करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम मधील 7 अन्वये संबंधितावर संजयनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी यासंबंधी तक्रार दिली, जिल्हा अधीक्षक कृषि अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली निरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.