पाणी पातळी 50 फूट ओलांडून पुढे
प्रतिनिधी / सांगली
सांगलीत कृष्णा नदीने 50 फुटाची आपली पातळी मागे टाकत झेप घेतली. शहरात पत्रकार नगर, सिटी हायस्कूल रोडसह काही भागात पाणी भरले. अफवा उठू लागल्या या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पाऊस मंदावला आहे त्यामुळे घाबरु नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आश्वासन केले आहे.
विसर्ग नियंत्रित करुन पाणी पातळी 52 फूटापेक्षा जास्त जाणार नाहीत असे प्रयत्न करत आहोत असे म्हटले आहे. 51/52 फूट पातळी स्थीर होऊन उतरु लागेल असेही देवकर यांनी म्हटले आहे. सांगलीत एक वाजता 50.8 पातळी होती.