रूग्णसंख्या कमी आल्याने प्रशासनाचा निर्णय : गरज पडल्यास पुन्हा कार्यान्वित करणार : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
कोविड रूग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील 33 डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रूग्णसंख्या वाढल्यास ही रूग्णालये पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
या हॉस्पिटल्सना प्रशासनाने पुरवलेले साहित्यही जमा करून घेण्याचे आदेश दिले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन अभावी मृत्युचे प्रमाण वाढले होते. बेड मिळत नसल्याने रुग्णांना वाहनामध्येच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली होती. शासकीय हॉस्पिटल्स, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या बरोबरीनेच खासगी हॉस्पिटल्सही मोठ्या संख्येने कोविड हॉस्पिटल केली होती. परंतु काही दिवसांपासून रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात पाच ते दहा रूग्णही नसतात. तर शहरी भागातही अनेक कोरोना हॉस्पिटलमध्ये हीच स्थिती होऊ लागल्याने प्रशासनाने रूग्णसंख्या कमी असणारी रूग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये रूग्णसंख्या वाढल्यास ती पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांना आदेशात म्हटले आहे. बंद रूग्णालयात नविन कोरोना रूग्ण घेऊ नयेत. सध्या दाखल रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर फॅसिलिटी ऍपवरील सर्व माहिती अद्ययावत करावी, प्रशासनाकडील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर परत करावेत, विहित पद्धतीने रूग्णालयातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केल्यानतंरच कोव्हिड रूग्णसेवा बंद करावे, असे नमूद केले आहे.
आदेश देण्यात आलेली हॉस्पिटल्स पुढीलप्रमाणे
मा चॅरिटेबल हॉस्पिटल जत, कोविड-19 हॉस्पिटल तासगाव, सद्गुरु हॉस्पिटल विटा, स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी, श्रीनाथ डीसीएससी आटपाडी, नुतन डीसीएचसी कवठेमहांकाळ, स्पंदन डीसीएचसी कडेगाव, मनमंदिर डीसीएचसी विटा, जीवनधारा हॉस्पिटल विटा, डीसीएचसी खानापूर, श्रीछत्रपती शिवाजीराजे डीसीएचसी आळसंद, वेध हॉस्पिटल डीसीएचसी तासगाव, पार्वती डीसीएचसी तासगाव सदिच्छा कोव्हिड डीसीएचसी आष्टा मातोश्री डीसीएचसी कासेगांव सहारा कोव्हिड हॉस्पिटल इस्लामपूर शिवगंगा डीसीएचसी पाटगांव ता. मिरज डॉ. रविंद्र वाळवेकर हॉस्पिटल सांगली डॉ. महेश दुधनकर हॉस्पीटल सांगली संजिवनी मल्टीकेअर हॉस्पिटल एलएलपी कुपवाड डॉ. शरद घाटगे मल्टीस्पेशालिटी सांगली सायना क्लिनिक हेल्थ सेंटर सांगली डॉ. दीपक शिखरे लाईफ केअर मल्टीस्पेशालिटा सांगली डॉ. विठ्ठल माळी, नोबल डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर मिरज डॉ. अनिल मडके, श्वास हॉस्पिटल सांगली भगवान महाविर कोव्हिड केअर सेंटर सांगली डॉ. कपिल त्रिशला हॉस्पिटल सांगली डॉ. सुरेश पाटील, हेल्थ पॉईंट मल्टीस्पेशालिटी मिरज डॉ. तुषार पिड्डे, शिवकृपा डेडिकेटेड कोव्हिड केअर हॉस्पीटल मिरज | न्यू लाईफ कोव्हिड केअर सेंटर सांगली नमराह कोव्हिड सेंटर सांगली डॉ. बसंत बुर्ले, संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. श्रीछत्रपती शिवाजीराजे डीसीएचसी आळसंद, वेध हॉस्पिटल डीसीएचसी तासगाव, पार्वती डीसीएचसी तासगाव सदिच्छा कोव्हिड डीसीएचसी आष्टा मातोश्री डीसीएचसी कासेगांव सहारा कोव्हिड हॉस्पिटल इस्लामपूर शिवगंगा डीसीएचसी पाटगांव ता. मिरज डॉ. रविंद्र वाळवेकर हॉस्पिटल सांगली डॉ. महेश दुधनकर हॉस्पीटल सांगली संजिवनी मल्टीकेअर हॉस्पिटल एलएलपी कुपवाड डॉ. शरद घाटगे मल्टीस्पेशालिटी सांगली सायना क्लिनिक हेल्थ सेंटर सांगली डॉ. दीपक शिखरे लाईफ केअर मल्टीस्पेशालिटा सांगली डॉ. विठ्ठल माळी, नोबल डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर मिरज डॉ. अनिल मडके, श्वास हॉस्पिटल सांगली भगवान महाविर कोव्हिड केअर सेंटर सांगली डॉ. कपिल त्रिशला हॉस्पिटल सांगली डॉ. सुरेश पाटील, हेल्थ पॉईंट मल्टीस्पेशालिटी मिरज डॉ. तुषार पिड्डे, शिवकृपा डेडिकेटेड कोव्हिड केअर हॉस्पीटल मिरज न्यू लाईफ कोव्हिड केअर सेंटर सांगली नमराह कोव्हिड सेंटर सांगली डॉ. बसंत बुर्ले, संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. |