प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते उस्मान नबी शेख यांचे सांगली येथे निधन झाले. आटपाडी तालुक्यातील घरनिकी गावचे सुपुत्र व पश्चिम भागातील सक्षम नेतृत्व म्हणून एडवोकेट उस्मान शेख यांचा नावलौकिक होता.
आटपाडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशा अनेक पदावर त्यांनी काम केले होते.